
श्री विठ्ठल कुणबी समाज बहू. मंडळ अकोला च्या वतीने दसरा स्नेहमिलन मेळवा रोकडे मंगल कार्यालय अकोला येथे उत्साहात संपन्न...
श्री विठ्ठल कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळ, अकोला यांच्या वतीने आयोजित दसरा स्नेहमिलन मेळावा रोकडे मंगल कार्यालय, अकोला येथे उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात समाजबांधवांनी सहभागी होत एकोपा, आपुलकी आणि बंधुभावाचा संदेश दिला.
- Date
- Friday, 24 October 2003
- Time
- 12:30
- Venue
- रोकडे मंगल कार्यालय अकोला
श्री विठ्ठल कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळ, अकोला यांच्या वतीने 'दसरा स्नेहमिलन मेळावा' मोठ्या उत्साहात संपन्न अकोला: समाजातील बंधुभाव वाढीस लागावा आणि सर्वांनी एकत्र येऊन समाजाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे, या उदात्त हेतूने श्री विठ्ठल कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळ, अकोला (रजि. नं. F-21908) व अकोला जिल्ह्यातील कार्यरत विविध कुणबी समाज मंडळांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दसरा स्नेहमिलन मेळावा अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला. शनिवार, दिनांक २४ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजता, नवीन बस स्थानकाच्या पाठीमागे, महसूल कॉलनी येथील रोकडे सभागृह येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. समाजासाठी एक दिवस ही भावना मनात ठेवून अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील शेकडो समाज बंधू आणि भगिनींनी आपली दैनंदिन कामे बाजूला सारून या मेळाव्याला ऐतिहासिक उपस्थिती दर्शवली. मान्यवरांची मांदियाळी आणि मार्गदर्शन: या दिमाखदार सोहळ्याचे अध्यक्षस्थान कुणबी समाज विकास मंडळ, शेगाव (जि. बुलढाणा) चे अध्यक्ष मा. श्री. दयरामभाऊ वानखडे यांनी भूषवले*. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बेलुरा येथील ह.भ.प. श्री. महेशजी महाराज मारवाडी आणि गुरुदेव सेवा आश्रम, पाटसुल येथील ह.भ.प. श्री. डॉ. शिवदास महाराज गाडेकर* लाभले होते. महाराजांनी आपल्या कीर्तनरूपी अमूल्य मार्गदर्शनातून समाज प्रबोधन करत उपस्थितांची मने जिंकली. प्रमुख अतिथींची उपस्थिती: या प्रसंगी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून अकोला अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष मा. श्री. रामेश्वरभाऊ फुंडकर* तसेच संत तुकाराम पतसंस्था (जळगांव जामोद) चे अध्यक्ष मा. श्री. रघुनाथजी कौलकार व ख्यातनाम सामाजिक कार्यकर्ते मा. डॉ. श्री. पुरुषोत्तमजी दातकर तसेच संत तुकाराम महाराज मंदिर समिती (वाडेगांव) चे अध्यक्ष मा. डॉ. वासुदेवराव फाळके त्याचप्रमाणे ज्येष्ठ विधिज्ञ मा. ॲड. श्री. विनोदजी फाटे आणि मर्चंट नेव्हीचे चीफ मा. कॅप्टन श्री. अतुलकुमार शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी समाजात शिक्षण, सहकार आणि आर्थिक सुबत्ता कशी आणता येईल, यावर आपले विचार मांडले. प्रमुख उपस्थिती व संघटन मेळाव्याला संत शिरोमणी तुकाराम महाराज कुणबी समाज मंडळ (अकोला जिल्हा) चे अध्यक्ष मा. श्री. सुभाषभाऊ दातकर, कुणबी समाज विकास मंडळ, शेगांवचे कोषाध्यक्ष मा.श्री.ज्ञानेश्वरभाऊ इंगळे व झेनिथ स्कूल (सस्ती) चे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. संदीपभाऊ गावंडे सामाजिक कार्यकर्ते मा. श्री.ॲड. गोपालभाऊ आखरे, संत तुकाराम महाराज कुणबी समाज ज्येष्ठ मंडळ (उमरी-अकोला) चे अध्यक्ष मा. श्री. रामेश्वरभाऊ चांदणे तसेच अ.भा. कुणबी युवा मंच (अकोला जिल्हा) चे अध्यक्ष मा.श्री. माणिकराव शेळके आणि महानगर कर्मचारी संघ (अकोला) चे अध्यक्ष मा. श्री. योगेशजी मारवाडी, मा.श्री.गजाननराव खोटरे जनरल मॅनेजर निर्माण मल्टीस्टेट को.ऑप.क्रेडीट सोसायटी अकोला. यांची प्रमुख उपस्थिती होती. मा.श्री.उमेशभाऊ थोरात कुटासा हमु.इंदौर, हे इंदौर वरुन आवर्जून दसरा मेळाव्या करीता आले होते.याप्रसंगी त्यांनी बाप-लेकीच्या नात्यातून सामाजिक संदेश देणारी आपली स्वरचित रचना सादर केली. अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील विविध मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी, संचालक व सदस्य यांनी एकत्र येत समाजाच्या एकजुटीचे दर्शन घडवले. महिला शक्तीचा उत्स्फूर्त सहभाग या मेळाव्याचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे महिला भगिनींची उपस्थिती. *रुक्मिणी कुणबी समाज महिला मंडळ, अकोलाच्या अध्यक्षा सौ. शोभाताई शेळके* यांच्या नेतृत्वात श्रीमती सुमनताई बालदाने, सौ. मायाताई डिवरे, सौ. मंदाताई थोटे, सौ. निलिमाताई घुंगळ, सौ. शुभांगीताई फाळके आणि सौ. वैष्णवीताई गावंडे यांच्यासह महिला मंडळाने कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोठे परिश्रम घेतले. कृतज्ञता आणि समारोप हा मेळावा यशस्वी करण्यासाठी श्री विठ्ठल कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळ अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ आणि आजीवन सभासदांनी अहोरात्र परिश्रम घेतले. आलेल्या सर्व समाज बांधवांचे विनीत म्हणून मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले, एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देत आणि समाजाच्या प्रगतीचा संकल्प सोडत या अविस्मरणीय स्नेहमिलन मेळाव्याची सांगता झाली, सूत्र संचालन ॲड.श्री गोपालभाऊ आखरे यांनी केले आणि यांनी मंडळा सोबत विविध विषयावर चर्चा करुन.. मंडळाच्या आजीवन सभासद मधुन तालुका समित्याच्या माध्यमातून अकोला जिल्ह्यातील समाज जोडला जाईल..अशी पुष्टी केली, प्रास्ताविक मंडळाचे सचिव श्री. सुरेशभाऊ फाळके यांनी केले, तर आभारप्रदर्शन मंडळाचे संचालक श्री. दीपकभाऊ गावंडे यांनी केले.

