कुणबी समाजोन्नती संघ, शाखा लांजा कुणबी युवा लांजा
अखंड सेवेची गौरवशाली १०२ वर्षं…🚩🚩
शतक महोत्सवी वर्षांत पदार्पण.. १९२०-२०२२
🍀कणबी समाजोन्नती संघ मुंबई
🔘सथापना १९२०= (९९ वे वर्ष)🔘
(Reg. under BPT act 1950 at Sr.No. F-54 Mumbai)
🌎कार्यालय : कुणबी ज्ञाती गृह (वाघे हॉल), सेंट झेवियर स्ट्रीट, परेल, मुंबई:४०० ०१२
💪🏼अखंड सेवेची अवरीत ९९ वर्ष..!
✅कणबी समाजोन्नती संघ, मुंबई , ह्या मातृ संस्थेची स्थापना स्वतंत्र पूर्व काळात म्हणजेच १९२० साली मुंबईत करण्यात आली. सोबत कुणबी बँक, या अर्थसहाय्य करणाऱ्या संस्थेची स्थापना कै. गुणाजी विठ्ठल माळी (गुरुजी) यांनी केली. गेली ९८ वर्ष कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई व मुंबई उपनगर अशा 7 जिल्ह्यात अखंडपणे कार्यरत आहे.
🌷क. गुणाजी विठ्ठल माळी (संस्थापक)
🌷क. पांडुरंग शेट वाघे (दानशूरनेते)
🌷क. शामराव (अण्णा) पेजे (समाजनेते), या तिन्ही नेतृत्वांचे योगदान कुणबी समाजाला प्रचंड आहे. समाज त्यांच्या ऋणातून कधीच मुक्त होऊ शकणार नाही एवढे महान कार्य त्यांचे समाजाला लाभले आहे.
⏺कणबी समाजोन्नती संघ, मातृ संस्थेच्या सलग्न
✅३२ तालुका शाखा
✅११ विभागीय शाखा, तसेच
✅कणबी विवाह सल्लागार मंडळ,
✅कणबी महिला मंडळ,
✅कणबी युवा मंडळ.
अशा विविध विंग कार्यरत आहेत. अनेक तालुका शाखा ह्या मुंबई शहर व ग्रामीण अशा दोन्ही ठिकाणी कार्यरत आहेत. तालुका शाखा अंतर्गत, कुणबी पतपेटी, शिक्षण संस्था व इतर सहकार क्षेत्र चालविण्यात येतात. संस्थेच्या वतीने विना अनुदान कुणबी विद्यार्थी हॉस्टेल चालविण्यात येते.
🔷कणबी समाजाचे तसेच ओबीसी बहुजन समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी गेली ९ दशके या संस्थेने काम केले आहे. लवकरच संस्थेचा शतक महोस्तव साजरा होणार आहे. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, व संविधानिक प्रश्न शासन दरबारी मांडून त्यांचा पाठपुरावा करून जनतेला फायदा मिळवून देण्यासाठी संघर्ष केलेला आहे. बेदखल कुळांचा प्रश्न, मालकी जमीन हक्क, शेतकरी मदत, आर्थिक सहकार चळवळ, अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती असे उपक्रम गेली ९९ वर्ष राबविण्यात आले आहेत. तसेच समाजावरील अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध आवाज उठविणे, ओबीसी आरक्षण, संविधानिक हक्क, कोकणातील जनतेला शासकीय सुविधा मिळाव्यात म्हणून रस्त्यावरचे आंदोलन संस्थेमार्फत घेण्यात आली आहेत हि माहिती अगदी थोडक्यात विषद केलेली आहे.
🌀कणबी युवा मंडळ मुंबई🌀
कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई सलग्न कुणबी युवा मंडळ, मुंबई हि एक तरुणांची महत्वाची विंग आहे.
सर्व क्षेत्रात कार्यरत असणारी उच्च शिक्षित युवकांची, न दमाची, नव तरुणाईची..चळवळ म्हणजेच “कुणबी युवा”
कुणबी संघ कार्यालय, परेल, मुंबई येथे महिन्यातील प्रत्येक ➡️बधवार व शनिवार हे कुणबी युवाचे संपर्क वर आहेत.
⏺समाजातील शिक्षित व सुशिक्षित तरुणाच्या विचारांना चालना मिळावी, त्यांच्या शिक्षणाचा उपयोग सर्व समाज घटकांना मिळावा. तसेच जागतिक बदलाच्या युगात समाजातही बदल घडावा म्हणून हि विंग आज १९६८ पासून कार्यरत आहे.
🔘कणबी युवा मुंबई यांनी आपल्या सलग्न 9 विभागांची रचना केली आहे. आणि त्यानुसार समाजातील हजारो युवक विविध विंग मध्ये समाज कार्य करीत आहेत. नाव जरी कुणबी युवा जातीचे असले तरी काम हे सर्व समाजासाठीच आहे. सामाजिक कार्य करताना जात-धर्म, वर्ण अजिबात पहिला जात नाही.
आजही भारतीय घटनेला सर्वोच्चपदी मानून कुणबी युवा मुंबई आपले कार्य करीत आहे. प्रबोधन हे मुख्य हत्यार युवा मंडळाचे आहे. वैचारिक परिवर्तन जो पर्यंत होत नाही तो पर्यंत कोणत्याही समाजाचा उत्कर्ष होणे संभव नाही. म्हणून समाजात जनजागृतीचे काम “कुणबी युवा मुंबई” करीत आहे.
🙏🏼सम्राट बळीराजा, जगत् गुरु संत तुकाराम महाराज, कुळवाडी भूषण छत्रपती शिवराय, महात्मा फुले, सावित्रीमाई फुले, राजश्री शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारी संघटना म्हणजे “कुणबी युवा मुंबई” संविधानाला सर्वोच्च मानून समाजात प्रबोधनातून वैचारिक परिवर्तन करणे हे अंतिम ध्येय..!
👍🏼परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. परंतु हे परिवर्तन समाजात करायचे कुणी ? परिवर्तन करायचे धाडस मात्र सहसा कुणाच्यात दिसत नाही. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यःच्या विचारात बदल घडविण्याचे सामर्थ्य आहे. आणि हेच सामर्थ्य कुणबी युवाने सिद्ध करून दाखविले आहेत. प्रतिभावंत, विचारवंत, साहित्यिक हे काही बाहेरून आयात करता येत नाहीत याची जाणीव कुणबी समाजातील युवकांना झाली आणि त्यांनी कुणबी युवा मुंबई या तरुणांच्या चळवळीला जबरदस्त चालना दिली. आज मुंबई व कोकणातील सात जिल्ह्यात या युवा मंडळाचे कार्य कमी अधिक प्रमाणत सूर आहे. युवकांचा प्रचंड ओढा हा “कुणबी युवा मुंबई” मध्ये सामील होत आहे.
कुणबी युवाची ध्येय व उद्दीष्टे :
१) जागतिक बदलाची भान असलेली आणि कर्तुत्ववान पीढी घडविणे.
२) समाजातील सर्व युवक युवातींना संघटित करुन ध्येय पुर्ततेसाठी प्रयत्न करणे.
३) समाजाचे संघटन वाढविण्यासाठी साधन आणि संसाधन निर्मिति करण्यासाठी युवकांना प्रेरित करुन मोठ्या प्रमाणात सक्रिय सहभागी करुन घेणे.
४) युवकांचे प्रबोधन करून त्यांना प्रोत्साहित करणे, प्रशिक्षित करुन त्यांच्यातील नेतृत्व क्षमता घडवून आणणे. त्यासाठी सभा, संमेलन शिबिर, मेळावे यांचे आयोजन करणे.
५) प्रशिक्षीत युवकांच्या मार्फ़त समाजामध्ये वैचारिक बैठका घेवून समाज प्रबोधन करणे.
६) “माझे शिक्षण माझ्या समाजासाठी” ही जाणीव युवकांमध्ये निर्माण करणे तसेच लेखन वाचन करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे.
७) समाजामध्ये स्वतंत्र्य, न्याय, समता, बंधुभाव या विचारधारेवर समाज जागृती करणे.
८) समाजातील अंध:श्रद्धा निर्मूलन करणे, जुन्या पीठिका, रूढ़ी, परंपरा याबाबत सातत्य पटवून देणे व सत्य शोधन करुन वैचारिक प्रबोधन करणे.
९) संविधानात्मक अधिकार, हक्क यांची ओळख व माहिती देणे.
१०) सामाजिक विचारांचा परिणाम हा राजकीय विचारांवर व्हावा यासाठी रचनात्मक व भौगोलिक बांधणी करणे.
११) बदलत्या जगाशी जुळवून घेण्यासाठी व आव्हान समजण्या साठी विविध विषयांवर व्यख्याने घड़वून आणणे.
१२) शासकिय व प्रशासकिय सेवेसाठी युवकांना मोठ्या प्रमाणात तयार करण्यासाठी प्रशिक्षण व मार्गदर्शनाची व्यवस्था करुन देणे.
१३) स्थानिक व सामाजिक पातळीवर घडणार्या अन्यायाविरुद्ध मोठ्या प्रमाणात वाचा फोड़णे व प्रतिकार करुन कायद्याने लढा उभारणे.
१४) लोकभाषा, लोकसाहित्य आणि लोकनाट्य यांची जपणूक करण्यासाठी विविध उपक्रम राबविणे व त्यात बदलत्या कळानूसार बदल घडवून त्याचा उपयोग समाज प्रबोधनासाठी घडवून आणणे.
१५) शासनातर्फे मिळणार्या सवलती, शिष्यशवृत्ति योजना, लघुउद्योग अशा विविध उपक्रमांची माहिती करुन देणे.
१६) युवकांना रोजगार व व्यावसायिक संधी निर्माण करुन देंण्यासाठी विविध संस्था मार्फ़त शिबिर राबविणे व मोठ्या प्रमाणात युवकांना त्याचा फ़ायदा करुन देणे.
१७) युवकांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी कला स्पर्धा व क्रिडा स्पर्धा राबविणे.
१८) हुशार व गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देणे.
१९) व्यसनमुक्ती याकरीता जनजागृती करणे.
२०) आणखी बरच काही… गरज आहे ती फक्त आपल्या सहकार्याची.
आजीवन सभासद नोंदणी :
” कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई ” समाजसंघटनेचा आजिव सभासद होण्यासाठी निकष व कागदपत्र
१) सभासदचा वय १८वर्ष पुर्ण असावे.
२) सभासद फक्त कुणबी समाजाचा असावा.
३) सभासद साठी शाळेचा दाखल्यावर कुणबी असा उल्लेख असावा किंवा जातीचा दाखला.
४) ओळखपत्र व पत्ता साठी आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड (कोणताही १)
४) २ फोटो
५) आजिव सभासद शुल्क रु.२३०/-
=============================
*समाजसंघटनेचा आजिव सभासद का व्हावे?*
१) आजिव सभासद असल्याने जातीचा दाखले, जात प्रमाणपत्र साठी समाजाचा दाखला मिळतो.
२) संघ सभासद असल्याने संघ, विभागीय शाखा, तालुका शाखा व संलग्न युवक, विवाह मंडळ पदाधिकारी होण्यास पात्र होऊ शकतो.
३) सामाजिक सलोखा राखण्यासाठी युवांच्या विविध विभागात, उपक्रमात काम करण्याची संधी उपलब्ध होते.
४) कुणबी समाजाचे आपल्या हक्काचे *”कुणबी भुमीपुत्र”* या पाक्षिकाचे सभासद होऊ शकतो.
५) वधू-वर सूचक विवाह मंडळ नोंदणीसाठी पात्र होऊ शकतो.
६) संघाचं सभासद असल्यास विद्यार्थी वसतिगृह (परेल), मुलुंड (नियोजित) प्रवेश मिळू शकतो.
७) आपण सुचविलेल्या विचारांवर विचार केला जातो.
८) संघटनेचे सभासद असल्याने एकजुटीने शासकीय, निमशासकीय, प्रशासन वर मुलभूत प्रश्न, सामाजिक समस्यावर लढा उभारू शकतो.
९) आपल्या सामाजिक लढाची राज्य, राष्ट्रिय पातळीवर नोंद घेतली जाते.
१०) ज्यांचा सामाजिक लढा मजबूत त्यांची संसद, विधिमंडळ मध्ये चर्चा होते.
११) सभासद झाल्याने समाजाचा (संघटनेचा) अधिकृतरित्या ओळखपत्र दिला जातो.
अजून बरेच काही.. फक्त गरज आहे आपण सभासद होण्याची.
*आजीव सभासद होण्यासाठी संपर्क करावा.*
संदिप पडये ( सचिव )
📲 9773383341
प्रकाश चंदुरकर ( खजिनदार )
📲 9930299103
सचिन मांडवकर (प्रचारक )
📲 9821125178
_________________
कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका लांजा संलग्न कुणबी युवा लांजा
Categories
- Right Of Information (RTI)
- Human Rights
- Grampanchayat
- Ratnagiri
- Raigad
- Sindhudurg
- Goa
- Mumbai
- Navi Mumbai
- Thane
FEATURED STORY
हर्चे ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराविरोधात उपोषण
लांजा, (वा.) तालुक्यातील हर्चे ग्रामपंचायतीत १४ व्या वित्त आयोग व अन्य योजनांतील कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात ग्रामस्थ अनिल सहदेव नार्वेकर यांनी १ मे पासून आमरण उपोषणाला बसले आहेत. आमरण उपोषण हर्चे ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होऊन ग्रामस्थांना न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. तालुक्यातील हर्चे ग्रामपंचायतीमध्ये १४ वा वित्त आयोग व अन्य कामांमध्ये मोठ्या

कुणबी युवा लांजा टी-शर्ट वितरण सोहळा कुणबी समाजोन्नती संघाच्या परेळ मुंबई इथे जोशात संपन्न झाला
मुंबई :- दिनांक २० जानेवारी २०२२ रोजी कुणबी समाजोन्नती संघाच्या परेल येथील कार्यालयात कुणबी युवा लांजाच्या टी-शर्टच्या वितरणला सुरुवात झाली. या वितरणाचा शुभारंभ संघ कार्यकारणी प्रतिनिधी तथा वरीष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रकाश तरळ, लांजा शाखा सचिव संदीप पडये, खजिनदार प्रकाश चंदूरकर व लांजा शाखाचे इतर पदाधिकारी यांच्या हस्ते व लांजा शाखा अध्यक्ष श्री. संतोष माटल

कोकणात ओबीसी समजबांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालावर विराट मोर्चा
कोकणात ओबीसी समजबांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालावर विराट मोर्चा |कोकणात उसळला ओबीसींचा जनसैलाब… महिलांचा प्रचंड सहभाग…! जातनिहाय जनगणनेसाठी ओबीसी बांधव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. आता विधानसभा, लोकसभेत झेंडा फडकविण्याची गर्जना

कोकणातून प्रवास करताय तर सावधान… चिपळूणजवळचा परशुराम घाट खचतोय..!
कोकणातून प्रवास करताय तर सावधान… चिपळूणजवळचा परशुराम घाट खचतोय..!

रत्नागिरीत थिबा राजवाडा,समुद्र किनारा, किल्ल्यासह स्मारकांना द्या भेटी
रत्नागिरी : कोरोनातील टाळेबंदीनंतर बंद ठेवण्यात आलेले रत्नागिरी शहरातील प्रसिध्द पर्यटनस्थळ थिबा राजवाडा, लोकमान्य टिळक स्मारकासह राज्य संरक्षित स्मारके आणि म्युझिअम पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे रत्नागिरीत फिरायला येणार्यांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे.

कोकणातील या सहा प्रकल्पांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय
कोकणातील सहा सिंचन प्रकल्पांच्या निविदा स्थगितीचा आदेश रद्द करण्यात आला आहे. कोकण : कोकणातील सहा सिंचन प्रकल्पांच्या निविदा स्थगितीचा आदेश रद्द करण्यात आला आहे. तसा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. कोकण विभागातील सहा प्रकल्पांमधील यापूर्वीचे निविदा विखंडनाचे आदेश रद्द करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली


Latest Posts
-
कोकणात ओबीसी समजबांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालावर विराट मोर्चा
November 27, 2021 -
-
-

kunbisamaj
कोकणातील सगळ्यात मोठ डिजिटल बातमीपत्र | कोकणी माणसाचं हक्काचं न्यूज चॅनेल.
YOU MAY HAVE MISSING
