
श्री दिपक सेवकरामजी गावंडे
Director – श्री विठ्ठल कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळ, अकोला
- Designation
- Director – श्री विठ्ठल कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळ, अकोला
- Place
- मु. पोस्ट हाता, ता. बाळापूर, जि. अकोला – 444311
About
श्री. दीपक सेवकरामजी गावंडे हे सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रातील शिक्षण घेतलेले, व्यावसायिक तसेच सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्त्व आहेत. Consulting Engineer आणि Government Contractor म्हणून ते कार्यरत आहेत. ग्रामविकास युवा प्रतिष्ठान, हाता तसेच माजी विद्यार्थी संघ, जिल्हा परिषद शाळा, हाता यांचे अध्यक्ष म्हणून ते गावाच्या विकासासाठी आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. ग्रामविकास युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावात स्वच्छता अभियान राबविणे, सार्वजनिक ठिकाणांचा विकास आणि सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देणे यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. विशेषतः २०२१ मध्ये वडिलांच्या निधनानंतर तेरवीचा विधी अत्यंत साधेपणाने करून त्या खर्चातून गावातील स्मशानभूमीला चेनलिंक फेन्सिंगचे कंपाउंड करून देण्याचा त्यांचा निर्णय सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण आहे. त्यांच्या संकल्पनेतून स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपण करण्यात आले असून ग्रामस्थांच्या सहकार्याने त्याची देखभालही केली जात आहे. देवावर श्रद्धा ठेवतानाच अंधश्रद्धेला विरोध करणारी विचारसरणी, पर्यावरण संवर्धनाची आवड आणि समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. त्यांनी आतापर्यंत २५ पेक्षा अधिक वेळा रक्तदान करून मानवसेवेचा आदर्श निर्माण केला आहे. श्री विठ्ठल कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळ, अकोला येथे संचालक म्हणूनही ते सामाजिक कार्यात योगदान देत आहेत.



